उपचार व शस्त्रक्रिया

- रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यालयीन कामकाज वेळेतच सर्वप्रथम फोन करून वेळ निश्चित करून घ्यावी.
- वेळ घेण्यासाठी 9850002204 आणि 9850002207 या क्रमांकावर फोन करावेत
- प्रत्यक्ष भेटण्यासाठी रुग्णाचे 2 फोटो, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, हॉस्पिटलचे इस्टिमेट, pet scan किंवा बायोप्सी केल्याची टेस्टचे पेपर, औषध किंवा गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरांचे सही शिक्के असलेले प्रिस्क्रीप्शन ई. कागदपत्रा सह समक्ष भेटणे.
- रुग्ण हक्क परिषद कार्यालयातील स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते तुमच्याशी बोलतील, संवाद साधतील. तुमचे प्रश्न व अडचणी समजून घेतील.
- आपल्या कॅन्सर ग्रस्त रुग्णाला हवे असणारे उपचार जसे की, रुग्णाला ऍडमिट करून द्यावे लागणारे उपचार, रुग्णावर करावी लागणारी शस्त्रक्रिया, केमोथेरपी तसेच आपल्या रुग्णाला हवी असलेली औषधे इंजेक्शने संपूर्णता मोफत किंवा सवलतीच्याच दरात कसे मिळतील यासंबंधीचे मार्गदर्शन आपणांस करतील.
- उपचार केमोथेरपी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ ओंको फिजिशियन, अंको सर्जन डॉक्टरांची वेळ निश्चित करून रुग्णाच्या तपासणीसाठी जे शक्य असेल ते सर्व प्रयत्न करतील.
- मोफत किंवा स्वस्त आणि सवलतीच्या दारातील उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्व शासकीय योजना आणि विविध माध्यमातून येणारे आर्थिक स्त्रोत त्यासाठी लागणारी कागदपत्रे यासंबंधीचे मार्गदर्शन आपल्याला रुग्ण हक्क परिषद कार्यालयातून मिळेल
- युनिव्हर्सल हॉस्पिटल- शनिवार वाड्याजवळ, कसबा पेठ पुणे, होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर, एडी कॅम्प चौक, न्यू नाना पेठ, पुणे हरजीवन हॉस्पिटल, सारसबाग समोर, स्वारगेट पुणे
- या तीनही ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील.