| पुणे आरोग्य महोत्सव |

पुणे आरोग्य महोत्सव | पुणे आरोग्य महोत्सव | पुणे आरोग्य महोत्सव

Rugnahakka website image (11)
  • रविवार दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी

     

  • सकाळी ९.०० ते  सायं ६ वा पर्यंत .

     

  • स्थळ : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे .
40 +

EXHIBITORS

350 +

BRANDS

150 +

PRODUCTS

20 +

INSTITUTE

नमस्कार !

आपल्या सर्वाच्या आरोग्य म्हणजेच शारीरिक, मानसिक समृद्धीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाचा आणि बहुमूल्य उपक्रमाचे आपण आयोजन केलेले आहे. पुणे आरोग्य महोत्सव २०२५ आपण साजरा करत आहोत. दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते  सायं ६ वा पर्यंत. आपल्या बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलावंत, अभिनेते. साहित्यिक आणि रसिक प्रेक्षक. पुणेकर नागरिकांच्यासाठी हा महोत्सव फक्त एक कार्यक्रम नाही. तर पुणे आरोग्य महोत्सव २०२५ आपल्या सर्वींच्या निरोगी जीवनाचा पाया नव्याने प्रस्थापित करणारे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. पुणेकर सर्वार्थाने जगात सर्वात हुशार आणि जागरूक मानले जातात, त्यामुळे आरोग्याचे महत्व तथा आरोग्य महोत्सवाचे खरे महत्व नक्कीच कळेल. या उपक्रमात सहभागी होऊन आपण आपल्या शहराला निरोगीपणाचा साज देऊ शकतो !! या महोत्सवात सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या, औषधे आणि इंजेक्शन्सची उपलब्धता, थेट रुग्णांची तपासणी, मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. याशिवाय चर्चासत्रे, परिसंवाद, कवी संमेलन, व्याख्याने, पुरस्कार वितरण सोहळा, नाटक, प्रहसन, स्मरणिका आणि पुस्तक प्रकाशन, पुस्तक प्रदर्शन, पुरस्कार वितरण, शासकीय योजनांची माहिती आणि आरोग्य योजनांची माहिती यामुळे हा सोहळ्यात सहभागी होऊन आपण ज्ञान आणि आरोग्याचा मौलिक खजिना मिळवणार आहोत ! मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, मंत्रालय मुंबई आणि रुग्ण हक्क परिषद हा महोत्सव आपल्या सर्वासाठी, आपल्या सर्वाच्या सहभागाने ऐतिहासिक करणार आहोत. ही पुणेकरांच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या उपक्रमात सहभागी व्हावे, आपल्या पुणे शहरात निरोगी आरोग्याचा प्रसार होईल आणि पुणेकरांचा हा प्रयोग जगात नावारूपाला येईल. तरी आपण सहकुटुंब या महोत्सवाला उपस्थित राहावे ! कळावे. धन्यवाद !

श्री. उमेश चव्हाण (रुग्ण हक्क परिषद, महाराष्ट्र)

भव्य महाआरोग्य शिबीर

हृदय रोग तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया

ईसीजी | पेसमेकर | अँजिओप्लास्टी |ओपन हार्ट सर्जरी | बायपास | व्हॉल्व्ह चेंज ऑपरेशन

कॅन्सरवरील मोफत उपचार व शस्त्रक्रिया

केमोथेरपी रेडिएशन | गाठींचे ऑपरेशन | कॅन्सरवरील सर्व ऑपरेशन | महागडी औषधे व इंजेक्शन | महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग

स्त्रियांच्या सर्व तपासण्या आणि औषधे वाटप

हिमोग्लोबिन | रक्तवाढीसाठी आणि मल्टी विटामिन | हाडे मजबुत करणे | मासिक पाळीवरील विषयी मार्गदर्शन

रक्तदान महा श्रेष्ठदान ! प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू

मेंदूच्या सर्व शस्त्रक्रिया

रक्ताच्या गाठी | मोफत उपचार | मेंदुच्या गाठी | मेंदुचे ऑपरेशन

गुडघ्याची तपासणी आणि शस्त्रक्रिया

गुडघ्याच्या वाट्या बदलणे | खुव्याचे बॉल वसवणे | ७०% मोफत ऑपरेशन

सर्व लहान मोठ्या आजारांच्या तपासण्या आणि औषधे वाटप

सर्व प्रकारचे आजार, पित्त, जळजळ | रक्तदाब | ताप थंडी | सर्दी - खोकला | अंग दुखणे | सांधे यावर इलाज व सल्ला देण्यात येणार आहे. | महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन वाटप | रक्तगट तपासणी.

अपंगाना कृत्रीम हात व पायाचे वाटप

मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप

मोफत शहरी गरीब योजना कार्ड काढून देणार

आवश्यक कागदपत्रे
२ फोटे | आधार कार्ड | रेशन कार्ड | उत्पन्न दाखला

मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देणार

आवश्यक कागदपत्रे
२ फोटे | आधार कार्ड | रेशन कार्ड | उत्पन्न दाखला

टिप : येताना जुने रिपोर्टस् सोबत आधारकार्ड व रेशनिंग कार्ड आणावेत.