
आमची माहिती
नमस्कार! डॉक्टरांचे संरक्षण आणि रुग्णांच्या न्याय हक्कासाठी लढणारी भारतातील पहिली आयएसओ मानांकित संघटना म्हणजे रुग्ण हक्क परिषद होय. रुग्ण हक्क परिषदेची स्थापना सन- ०८ एप्रिल २०१४ रोजी संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. रुग्णांना मोफत उपचारांचा हक्क तथा अधिकार मिळालाच पाहिजे, यासाठीची जनमानसातील लोकप्रिय चळवळीतील संघटना म्हणून रुग्ण हक्क परिषद सुप्रसिद्ध आहे.
रुग्ण हक्क परिषदेने ” कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियान ” २०२५- २०२९ ही पाच वर्ष कॅन्सर रुग्णांना मोफत उपचार मिळावेत, यासाठी समर्पित केलेली आहेत. समाजातील कॅन्सरने घातलेले थैमान त्यासाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च मोफत करण्यासाठीच कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत महागडे उपचार व शस्त्रक्रिया मोफत करण्यात येतील, अशी माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख उमेश चव्हाण यांनी दिली.

आत्ता बदलते वातावरण आणि अनैसर्गिक जीवन पद्धतीमुळे महाराष्ट्रात कॅन्सर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. महागड्या उपचारांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त, कर्जबाजारी झाले आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिलासा व आधार देण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आले असून, या अभियानांतर्गत कॅन्सरवरील महागडे उपचार मोफत करण्यात येणार आहेत. कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानाचे प्रमुख तथा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण .
युनिव्हर्सल हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्मिता भोयर, होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटरचे मुख्य संचालक डॉ. अमोल देवळेकर, रुग्ण हक्क परिषदेचे केंद्रीय सल्लागार माजी सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठे, अमोल हुलावळे एकजुटीने काम करत आहेत.
सध्या स्त्रियांमध्ये स्तनाचा, पिशवीचा कॅन्सर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. तोंडाचा, जिभेचा, रक्ताचा, मेंदूचा, अंडाशयाचा, त्वचेचा कॅन्सर बळावत आहे. तसेच शरीरावर विविध ठिकाणी येणाऱ्या गाठी कॅन्सरच्या असल्याचे निदर्शनास येत आहे.
लाखो रुग्ण कॅन्सरवरील उपचार घेत आहेत. कॅन्सरवरील उपचार घेताना रुग्णांना आर्थिक तडजोड करतानाच कर्जबाजारी व्हावे लागत. अनेक कुटुंबांवर गाडी, दागिने, राहते घर विकून उपचार घेण्याची वेळ येत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे.”
“कॅन्सरसाठीची केमोथेरपी, इमिनोथेरपी, कॅन्सरचे ऑपरेशन, रेडिएशन, आवश्यक औषधे व इंजेक्शन यांच्या किमती लाखो रुपयांच्या घरात आहेत. सर्वसामान्य माणसाला हे उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियानांत कॅन्सरवरील केमोथेरपी आणि ऑपरेशन शासकीय योजनांच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.
पुण्यातील शनिवारवाडाजवळ असलेल्या युनिव्हर्सल हॉस्पिटल आणि नाना पेठेतील होप हॉस्पिटल अँड कॅन्सर सेंटर येथे ही मोफत उपचार सुविधा उपलब्ध असणार आहे. अधिक माहितीसाठी रुग्णांनी व नातेवाईकांनी ९८५०००२२०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
रुग्ण हक्क परिषदे
कॅन्सरमुक्त महाराष्ट्र अभियान
संपर्क
९८५०००२२०७ / ९८५०००२२०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
९८५०००२२०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

श्री. उमेश चव्हाण
संस्थापक अध्यक्ष- रुग्ण हक्क परिषद

श्री. मिलिंद गायकवाड
प्रमुख मार्गदर्शक

श्री. राजेंद्र कदम
राज्य समन्वयक

श्री.भानुप्रताप बर्गे
संचालक

सौ. अपर्णा मारणे साठ्ये
अध्यक्ष - पुणे शहर

श्री. जानमोहम्मद पठाण
संचालक

श्री. आशिष गांधी
उपाध्यक्ष

सौ. संगीता पाटील
संचालक

श्री. संजय आल्हाट
सरचिटणीस, महा. प्रदेश

मा. इकबालभाई शेख
मुख्य संचालक

श्री. सुरेश फाले
सह. संचालक

श्री. राहुल हुलावळे
संचालक